Koregaon Bhima Violence: सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Bhima_Koregaon_violence

पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नागपूरमधील इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस सुरेंद्र गडलिंग यांना १४ जून पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिले आहे,

अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनागर जिल्हा न्यायालयात सकाळी ५ ते ७ दरम्यान सुनावणी झाली, तर सुरक्षेच्या कारनास्थव आरोपीला पहाटे हजर करण्यात आली असल्याची शक्यता आहे. तर इतर आरोपींना गुरुवारी दुपार पर्यत न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.’

याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील अॅड उज्वला पवार यांनी युक्तिवाद केला की, अटक केलेले आरोपी हे सीपीआय या माओवादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, पोलिसांनि त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याकुडून ८१ कागदपत्रे जप्त करणात आली आहेत. त्या कागदपत्रामध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबतचे नकाशे मिळाले आहेत. हे नकाशे सीपीआय ला पुरविण्यात आले असल्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा यबाबत देखिल काही पुरावे मिळले आहेत त्याच्या रिमांड रिपोर्ट मध्ये एकूण १६ मुद्दे आहेत, त्या आधारे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड पवार यांनी केली होती. आरोपींच्या वतीने अॅड मालवीय यांनी युक्तिवाद केला.