दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याला सुरेखा पुणेकरांचे आक्रमक उत्तर

darekar-punekar

पुणे : सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर ह्या उद्या(१६ सप्टें.)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुरेखा यांनी देखील दरेकरांना आक्रमक होत उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,’राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे’. तसेच या कारणामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की,’राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका. मात्र महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?’. तसेच ‘दरेकरांनी यासाठी माफी मागावी, त्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत,’ असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, काल प्रविण दरेकर शिरुर दौऱ्यावर एका कार्यक्रमात बोलत असतांना दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की,’राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे’. दरेकरांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या