fbpx

संजय काकडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया…

”सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू’ असे वक्तव्य काकडेंनी केले होते. काक या वक्तव्याकडे सुप्रिया सुळे यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. ‘आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली

संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे प्रचार दरम्यान त्यांनी ‘पत्रकारांसोबत संवाद साधला.

मी विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण करते. विकासाचे मुद्दे हेच माझे प्रचाराचे मुद्दे असतील.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा हे देशापुढील प्रमुख प्रश्न व आव्हाने आहेत. हे प्रश्न घेऊन आम्ही जनते समोर जाणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.