पुणे – २०१४ मध्ये भाजपने केंद्रासह महाराष्ट्रात देखील सत्तास्थापन केली होती. यानंतर, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाली होती. मात्र, २०१९ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याचं भाष्य केलं होतं. त्यांची पद्धत महाराष्ट्राने नाकारली आहे त्यामुळे त्यांनी आता रिटायर्ड व्हावं, असं देखील एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते. यानंतर, फडणवीसांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
याच मुद्द्यावरून नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना प्रहार केला आहे. “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.”असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं होते.
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांनी निवृत्त होणं महाराष्ट्राला मान्य नव्हतं… फिर अकेले देवेंद्र फडणवीस क्या करेंगे? देवेंद्र फडणवीस एकीकडे आणि संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे – खा. सुप्रियाताई सुळे@supriya_sule @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #navimumbai pic.twitter.com/jR6V1DinEp
— NCP (@NCPspeaks) February 19, 2021
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडीयावर चांगलीच टीका करण्यात आली होती. फडणविसांनी ठरवले असते तर त्यांनी सुळे यांना प्रत्युत्तर देखील दिले असते मात्र फडणवीस त्यावेळी शांत राहिले.पुढे अधिवेशन सुरू झाले नि ‘अकेला देवेंद्र फडणवीस क्या क्या कर सकता हैं’, याचा प्रत्यक्ष अनुभव फक्त सुप्रिया सुळेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आला.
पूजा चव्हाण प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर फडणवीस यांच्यासोबत भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार संजय राठोड यांच्यामुळे मोठ्या अडचणीत आले ते फडणवीस यांच्यामुळेच. याचाच पुढे परिपाक आपणास संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या रूपाने दिसून आला.
पुढे अधिवेशन सुरु झाल्यानंतर फडणवीसांनी अत्यंत आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करून सरकारची चांगलीच तारांबळ उडवली.वीजबिल, शेतकऱ्यांचे,कष्टकरी समुदायाचे,विविध समाजाचे प्रश्न फडणवीस यांनी लावून धरले. अजित पवार सोडले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पर्यंत सरकारचा एकही मंत्री फडणविसांच्या आक्रमणापुढे तग धरू शकला नाही. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास, संबंधित विषयाचा आवाका आणि त्याउपर आक्रमकता पाहून अवघा महाराष्ट्र आवाक झाला.
त्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ;ॅन्टिलिया’ इमारतीबाहेरील स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू आणि शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी सरकारला गोत्यात आणले. अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चांगलीच अडचण झाल्याचे तेव्हा अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. फडणवीस यांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी अन्वय नाईक आणि मोहन डेलकर प्रकरण देशमुख यांनी उकरून काढले पण त्याचा फारसा फायदा सरकारला झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला हा तर फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक मानला गेला. पुढे वाझे प्रकरणात रोज नवे खुलासे होऊ लागले आणि परमबीर सिंघ यांच्या पत्ररूपी बॉम्बमुळे सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.यातूनच मग पुढे गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील विकेट गेली.
देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांना देखील मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला राजीनामा द्यावा लागल्यानंतर अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है हे सुप्रिया सुळे यांनी पाहिले का हा सवाल विचारला जात आहे. खरतर सत्तेच्या धुंदीत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या एका मुत्सदी नेत्याला तुच्छ लेखणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण या टीकेने खचून न जाता आपल्या नेतृत्वगुणांचा अवघ्या महाराष्ट्राला परिचय देत फडणवीस यांनी आपल्या कृतीतून एक देवेंद्र क्या क्या कर सकता है हे दाखवून दिले आहे अजून काय काय पाहावं लागणार हे विधात्यासच ठावूक.
महत्वाच्या बातम्या
- ‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार सुरूच; नातेवाईकांच्या नाईलाजाचा फायदा घेवून सुरु आहे लुटमार
- मुंबईत केवळ ‘इतकाच’ लसींचा साठा; महापौर पेडणेकरांची केंद्राकडे लस पुरवण्याची मागणी
- ‘स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे, व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस बच्चू कडूंनी दाखवावे’
- नाकावरून मास्क खाली घसरला,पोलिसांनी केली रिक्षा ड्रायव्हरला बेदम मारहाण
- सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलून भांडणे लावू नका; भांडारी यांचे सरकारला आवाहन