सुप्रिया ताईनी साजरे केले ‘रक्षाबंधन’

वेबटीम:- भावा बहिणी मधला आपुलकीचा दिवस म्हणजे ‘रक्षाबंधन’ आणि यात नेते मंडळी तरी कशी मागे राहतील. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजराे केला यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळेस ताईनी अजित दादाना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबियानंसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.