fbpx

खासदार सुप्रिया सुळेंनी उदयनराजेंसह घेतली राम शिंदेंची भेट

टीम महाराष्ट्र देश : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जात भेट घेतली.

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्यानिमित्ताने राज्यभरातून अहिल्यादेवींचे अनुयायी त्यांच्या चौंडी या जन्मगावी जाऊन अभिवादन करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार उदयराजे भोसले यांनीही चौंडी येथे जात अभिवादन केले.

त्यानंतर सुप्रिया सुळे आणि उदयनराजे भोसले यांनी अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जात भेट घेतली. त्यावेळी राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे आणि उदयनराजे यांना अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली.

विशेष म्हणजे, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची विधानसभा निवडणुकीतून एन्ट्री होणार आहे. रोहित पावर हे राम शिंदे यांच्या विरोधात कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी लढवणार असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांनीही याबाबत भाकीत केले आहे. त्यामुळे सुळे – शिंदे भेटीवरून चर्चा रंगताना दिसत आहे.