मुंबई : निवडणूक आयोगाने (निवडणूक आयोग) धनुष्यबाण गोठवला असून शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अथवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लावता येणार नसल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे.
सुप्रिया सुळे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला –
एकनाथ शिंदे यांच्यावर टोला लगावत असताना सुप्रिया सुळेंनी एका गाण्याच्या ओळ्या गायल्या आहेत. यावेळी हम बेवफा हरगीज नही थे पर हम वफा कर ना सके, असं सुळे म्हणाल्या. तसेच यावेळी याआधी देखील असं झालं असून हे कटकारस्थान उद्धव ठाकरेंसाठी केलं गेलं आहे. मात्र, मला शिंदे गटाची काळजी वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी हे गाणं आठवत’ असं टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
फडणवीस सगळंच बोलतात ते खरं नसतं –
राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 ला संपली असं काहीजण म्हणत होते. मात्र, असा पद्धतीने पक्ष संपत नसतात, असंही त्या म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवरही टीका केली आहे. फडणवीस (Devendra Fadanvis) सगळंच बोलतात ते खरं नसतं, पक्ष बदलल्यावर असं बोललं जातं, राष्ट्रवादीवर आरोप केले जातात, असं देखील त्या म्हणाल्या.
पुण्यातील एका कार्यक्रमात एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते. यावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर संस्कार झाले त्यात आई वडिलांना आदराचे स्थान आहे. माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलं नाही, असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “देवेंद्रजी, ५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, तुम्ही असं करायला नको होतं”; खैरे संतापले
- Viral Video | कुत्र्याने केले वाघाला बेहाल, पाहा व्हिडिओ!
- Farming Update | मसूर मिश्र लागवडीवर शेतकऱ्यांना मिळू शकते भरघोस उत्पन्न
- Shivsena | ठाकरे अन् शिंदे गट यांचा अॅक्शन मोड! दुपारच्या बैठकीनंतर नंतर टाकणार डाव?
- Video : काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा दानवेंसोबत एकाच कारमधून प्रवास