आरेतील वृक्षतोडी विरोधात सुप्रिया सुळे यांच्या संतप्त प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीतील सप्तस्वातंत्र्यापैकी एक असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकार पायमल्ली करत आहे. आरे वृक्षतोडीच्या विरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या २९ कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हे सरकारने दाखल केले आहेत. अशा संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवरून दिल्या आहेत.

मेट्रो कारशेडसाठी उच्च न्यायालयाने मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर एका रात्रीत २०० हून अधिक झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही या वृक्षतोडी ला विरोध दर्शविला आहे.

यावेळी सुळे यांनी याचा आम्ही कठोर शब्दात विरोध करत आहोत. या कार्यकर्त्यांना जमीन मिळावा यासाठी मदत करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. निवडणुकीचे कारण देत सत्ताधारी पक्ष या मुद्य्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. असे सांगत त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आंदोलकांना पाठींबा दिला आहे.

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी परिसरातील पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी विरोध दर्शविला आहे. पर्यावरणप्रेमींनी मेट्रोच्या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावत राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला झाडे तोडण्यास परवानगी दिली. मेट्रो प्रशासनाने सुरु केलेल्या वृक्षतोड मोहिमेत काही तासांमध्ये २०० हून अधिक झाडे कापण्यात आली आहेत.

पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी याठिकाणी जमण्यास मज्जाव केल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. सध्या आरे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही अरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या