सुप्रिया सुळेंनी माझा राजकीय भाव वाढवला- भाजप आमदार प्रसाद लाड

supariya sule vr prasad lad

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत ‘मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का?’ असा प्रश्न उपस्थित केला. याला आमदार लाड यांनी उत्तर दिले आहे.

Loading...

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?

सुरेश प्रभू BCAS ने स्पष्टपणे सांगितलेय की क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस ही प्रसाद लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपमध्ये पावन झाला का नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी हे सर्व तुमच्या डोळ्यादेखत होतेय. हाच का तुमचा पारदर्शक कारभार ?

प्रसाद लाड म्हणाले, ‘खासदार सुप्रिया ताईंनी केलेल्या ट्वीटबद्दल मला अतिशय दुःख झालं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हापासून बिझनेसमध्ये आहे. जेव्हा मी त्यांच्या पक्षात होतो तेव्हा हाच व्यवसाय करत होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं. त्यांनी संबंधितांकडून नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. पवार साहेब मला नेहमी सांगायचे ‘आरोप झाले की तो माणूस मोठा होतो.’ ताईंनी ट्विट केल्यामुळे माझा राजकीय भाव वाढला. राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे.’Loading…


Loading…

Loading...