सुप्रिया सुळे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नऊ सप्टेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर असून, तीन दिवस त्या परभणीसह हिंगोली व औरंगाबादमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे नऊ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता वसमत (जि. हिंगोली) येथील विधिज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स व व्यावसायिकांशी संवाद साधतील. सकाळी अकराला विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद. दुपारी साडेबाराला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक. दुपारी अडीचला पत्रकारांशी वार्तालाप, दुपारी साडेतीनला हट्टा (ता. वसमत) येथील विद्यार्थ्यांशी संवाद. सायंकाळी साडेसहाला यशवंतराव चव्हाण विभागीय कार्यालयात बैठक होणार आहे.

मंगळवारी सकाळी अकराला जिंतूर (जि. परभणी) येथे मातंग समाजाच्या मेळाव्यास मार्गदर्शन, दुपारी बाराला जिंतूर येथे शेतकरी मेळावा, दुपारी चारला सेलू येथील बाबासाहेब मंदिरास भेट, साडेचारला विधिज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स व व्यावसायिकांशी संवाद. बुधवारी (ता. 11) सकाळी दहाला औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद, साडेअकराला विधिज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स व व्यावसायिकांशी संवाद, दुपारी दोनला पत्रकार परिषद, अडीचला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक, दुपारी साडेचारला विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक, रात्री साडेसातला विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी जाहीर सभा होईल.