सुप्रिया सुळे माझ्या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांचे सेल्फी काढत होत्या, आता सत्तेसाठी जुळवून घेताहेत- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

मुंबई : सुप्रिया सुळे या माझ्या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांचे सेल्फी काढत होत्या, आता त्यांना हे बलात्कार आणि कोयत्याने वार करणे या घटना दिसत नाही का?, आता सत्तेसाठी त्या महिलांच्या सुरक्षेबाबतही जुळवून घेत आहेत. अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. मुंबईत पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, ‘मला चिंताही व्यक्त करायची आहे आणि जुनी आठवण करुन द्यायचीय की, देवेंद्र फडणवीस ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी नागपूरमध्ये खुट्ट जरी झाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये पाकिटमारी असे बोलले जायचे. मग आता नितीन राऊत काय झोपा काढतायत काय? त्यांना नागपूरमध्ये झालेले गुन्हे कळत नाही काय? महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. महाराष्ट्र दिल्लीपेक्षाही मुलींच्या सुरक्षितेबाबत पुढे होता. तो आता पूर्ण रसातळाला गेला आहे.

घरातल्या कुणाला तरी सोबत घेतल्याशिवाय मुलींना घराबाहेर पडता येत नाही. या स्थितीवर सुप्रिया सुळे का बोलत नाहीत? त्यांना माझ्या काळामध्ये रस्त्याचे खड्डे दिसायचे आणि त्या सेल्फी काढायच्या. त्यांना हे बलात्कार आणि कोयत्याने वार करने दिसत नाही का? सत्तेसाठी महिलांच्या सुरक्षेबाबतही जुळवून घ्याचये?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

महत्वाच्या बातम्या