Share

Supriya Sule | “हे सरकार असंवेदनशील, ओला दुष्काळ जाहीर करा” ; सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. राज्यसरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली. आज त्यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) येथे पत्रकारांशी संवाद साधला.

आपण सर्वांनी एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, कोविड काळात आपण सर्व लॉकडाऊनमध्ये होतो. त्यावेळी एक व्यक्ती अशी होती की, जी सातत्याने प्रत्येक बांधावर काम करत होती ती म्हणजे शेतकरी. कोविड काळात अनेक गोष्टी कमी पडल्या पण अन्न मात्र कमी पडू दिले नाही. देशातील काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला याचे श्रेय जाते, असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी नमूद केले.

मंत्रालयात किती वेळ सरकार होते-

असंवेदनशील हे सरकार आहे. मंत्रालयात येऊन आढावा घेणे, बांधावर जाऊन आढावा घेणे, यापैकी काहीच आपल्याला दिसत नाही. मला असे वाटते की, कोणीतरी तीन महिन्यांचा आढावा घ्यावा. मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्या, मंत्रालयात किती वेळ सरकार होते, फिल्डवर जेव्हा हे सरकार होते तेव्हा ते जनतेसाठी होते की मेळाव्यासाठी होते, कलेक्टरांचा किती वेळा रिव्ह्यू घेतला, पालकमंत्री किती आढावा घेतात असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) हे जेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा दर शुक्रवारी मीटिंग घ्यायचे. सर्व जिल्ह्याचा आढावा घ्यायचे याचे स्मरण करून देत आता असे काहीच होताना दिसत नाही, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारची टाळाटाळ-

राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार अजूनही नुकसान भरपाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तिथे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now