fbpx

सुप्रिया सुळेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे बालीशपणा; जानकरांची टीका

पुणे – वर्धा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही म्हणून नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली.

त्यानंतर आता महादेव जानकर यांनी पलटवार केला आहे. ते पुण्यात बोलत होते.नरेंद्र मोदींबाबतची टीका पाहून सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचं दिसून येतं आहे, असं म्हणत जानकर यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पवार कुटुंबावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याची काही गरज नाही त्यांच्या कामातून प्रसिद्धी मिळत आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मागील दहा वर्षात सुप्रिया सुळे यांची मतदार संघातील कामं पाहता यंदा त्यांचा पराभव निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.