फडणवीसांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी – सुप्रिया सुळे

इंदापूर – जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन – तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे. राज्यात अजित पवारांसारखी चांगली ट्यूशन कोणीच घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ट्यूशन लावावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. तेव्हा त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दौऱ्यावर असताना बोलत होत्या.

You might also like
Comments
Loading...