fbpx

दौंड; सुप्रिया सुळेंनी घेतली ‘त्या’ सहा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

supriya sule 1

टीम महाराष्ट्र देशा-  दौंड शहरात  सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी १६ जानेवारी रोजी जुगार आणि सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून सहायक उप निरीक्षक संजय शिंदे याने केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले गोपाल शिंदे, परशूराम पवार व अनिल जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.दौंड शहरात सहायक पोलिस उप निरीक्षकाच्या गोळीबारात ठार झालेल्या कुटुंबातील सहा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

  खासदार सुप्रिया सुळे यांनी तिन्ही कुटुंबांचे सांत्वन करीत तिन्ही कुटुंबातील एकूण सहा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर तिन्ही कुटुंबातील गरजू महिलांपैकी एका महिलेला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासह अन्य दोन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधितांशी चर्चा केली. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, माजी शहराध्यक्ष अॅड. अजित बलदोटा, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आदी या वेळी त्यांच्यासमवेत होते.

1 Comment

Click here to post a comment