ऐन प्रचाराच्या धामधुमीत सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे प्रचाराला लागले आहेत. परंतु विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला एक जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांऩा डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनीच आपल्या फेसबुक पेजवरून दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या आहेत. महिला संघटनासोबतच राज्यात अनेक विषयांवर त्यांनी नेतृत्व केलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या संवाद दौऱ्याचे आयोजन ही त्यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या