मी आणि पवारसाहेब कधी खोटंं बोललो हे तावडेंनी दाखवावं – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंची शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिका

पुणे: समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोट बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच मी आणि पवारसाहेब कधी खोटंं बोललो हे तावडेंनी दाखवावं अस आवाहन देखील केले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगत, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येच कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणे असच होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले,

आम्ही शिक्षणामध्ये कोठेही राजकारण करत नाही. मात्र, जिल्ह्या परिषदेच्या शाळांमध्ये ‘चाचा चौधरी आणि मोदी’ यासारखी पुस्तके आणून सरकारच राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिका त्यांनी केली.