Share

Supriya Sule | धनुष्यबाण चिन्हं गेलं तर? सुप्रिया सुळे म्हणतात…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेना पक्ष हस्तगत करण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेला मोठा झटका देऊ शकतो. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह जर शिंदे गटाकडे गेले तर उद्धव ठाकरेंना फटका बसनार का?, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी काही सहकाऱ्यांकडे हा मुद्दा काढला. त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या. आपला पक्ष जेव्हा वेगळा झाला. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. निवडणुका झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तीन महिन्याच्या आत सोशल मीडिया नसताना चिन्ह घराघरात पोहचवलो. आपले उमेदवार निवडून आले. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील १० दिवसात चिन्ह घराघरात पोहचवल्या जाते. त्यामुळे चिन्ह गोठवलं कींवा दिलं नाही तर शिवसेनेला फार फरक पडणार नाही.”

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास?-

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास, नव्या चिन्हांसह लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यासाठी ठाकरेंनी टीम देखील तयार केली आहे. पहिली निवडणूक आहे, असं समजून लढायचं, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे लागले तयारीला-

शिवसेनेने पहिली निवडणूक चिन्ह नसताना लढवली होती. शिवसेनेने १९६७ साली प्रजा समादवादी पक्षासोबत युती केली होती. शिवसेनेचे तेव्हा ४२ नगरसेवक निवडूण आले होते. बहुमत असल्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे जाऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.

धनुष्यबाण कुणाचा?

निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले की, एक तर चिन्ह शिंदे गटाकडे जाईल किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल. दोन्ही गटाकडे चिन्ह गेले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येणार. कुरेशी एका मुलाखतीत म्हणाले, दोन्ही गटाचे दावे तपासले जातील. तसेच प्रत्येकाची सही तपासली जाईल. दोन्ही गट आपले दावे मांडतात, या सगळ्या प्रोसेसला ४ ते ५ महिने लागतात. या दरम्यान निवडणुका झाल्या तर निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवतात आणि दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नाव आणि चिन्ह देतात.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेना पक्ष हस्तगत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now