Supriya Sule | पुणे : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला. यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत.” तसेच मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. मंत्री असो किंवा नसो, मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये,” अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली.
पुढे त्या म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केलं. तसेच त्यांनी समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केलं. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. हे गैरसमजातून आणि चुकीच्या संवादातून झालं आहे असं मला वाटतं,” असं मत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडलं.
काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ruta Awhad | जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच पत्नी ऋता आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेसंबंधित शेतकऱ्यांना ‘ह्या’ चुका पडू शकतात महागात
- Atul Bhatkhalkar । “ती महिला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का?”; भातखळकरांचा सवाल
- Anjali Damania | “जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले, पण…”, अंजली दमानियांचे विधान
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये”, जयंत पाटलांची विनवणी