fbpx

भगवान के घर देर है, अंधेर नहीं – सुप्रिया सुळे

chagan bhujbal and supriya sule

टीम महाराष्ट्र देशा: छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला आहे, गुन्हा सिद्ध न होता त्यांना २ वर्ष तुरुंगात ठेवणे हा खूप मोठा अन्याय असून भगवान कर घर देर हे,अंधेर नही म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळ यांच्या जामिनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे छगन भुजबळ यांना आज मुंबई उच्चन्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती

काय आहे प्रकरण ?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.