fbpx

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडले ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक !

टीम महाराष्ट्र देशा – कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य आणि कामाच्या वेळेशिवाय ऑफीसचे फोन,इमेल नाकारण्याचा हक्क प्रदान करणारे ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी सुळे यांनी मोहिम राबवायला सुरुवात केली आहे.

‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाल तर कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य आणि कामाच्या वेळेशिवाय ऑफीसचे फोन,इमेल नाकारण्याचा हक्क प्रदान होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या  मानसिक आरोग्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी ही पिटीशन नक्की साईन करा असे आव्हान करून या व्यापक मोहिमेचा भाग व्हा…#RightToDisconnect म्हणत मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.