सुप्रिया सुळे यांची आता मैदानावरदेखील बॅटींग

पुणे – सुप्रिया सुळे आपल्या जाहीर सभामधून विरोधी पक्षावर कायमच जोरदार बॅटींग करत असतात. पण आज पुण्यात सुप्रिया सुळे यांनी मैदानात देखील बॅटींग केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावाढदिवसानिमित्त पुण्यात काँग्रेस पक्षाकडून वीस वर्षाखालील महिला क्रिकेट करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेच उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सुप्रिया सुळे यांनी हातात बॅट घेत आपल्यातील फलंदाजीचे कौशल्य दाखवले. तसेच त्यांनी गोलंदाजीही केली.

यापूर्वीच काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपले तलवारबाजीचे कसब दाखवले होते. सुप्रिया सुळे यांची मैदानावरील बॅटींग पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या दीपक साळुंखे पाटलांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादीची टाळाटाळ ?Loading…
Loading...