सुप्रिया सुळे यांनी तारिक अन्वर यांना विचारला ‘हा’ मार्मिक सवाल

supriya sule

मुंबई- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला पक्षाला राम राम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पवारांवरही तोफ डागली आहे. शरद पवार यांच्यावर अन्वर यांच्याकडून होत असलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत.

तारिक अन्वरजी ‘आपने दिल तो तोड दिया.’ राजीनामा देण्यापूर्वी एकदा तरी आमच्याशी बोलायला हवं होतं. वाईट या गोष्टीचं वाटतं की, ज्या माणसावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, नेता मानला त्यांनी खातरजमा न करता राजीनामा दिला. असं होत असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा?, असा मार्मिक सवालही सुप्रिया सुळेंनी ट्वीट करून उपस्थित केला आहे.

अन्वर याचं नेमकं काय म्हणणे आहे ?
राफेल डील संदर्भातील पवार साहेबांचं विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती.

शरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. मी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही.

‘या’ पक्षात जाण्याचा पर्याय तारिक अन्वर यांच्यासाठी असेल खुला