‘त्या’ गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेने एक छदामही दिला नाही : सुळे

पुणे : पुणे महापालिका हददीत 11 गावांचा समावेश करण्यात आला मात्र त्यांच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी एक पैसाही दिला नाही असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या 11 गावांमधील विविध समस्याबाबत काल राष्ट्रवादी कॉंग्रेसनं महापालिकेवर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रत्येक गावासाठी 100 कोटी रूपये याप्रमाणे एकंदर 1100 कोटी रूपयांचं पॅकेज द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या गावांमधील नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेवर सोमवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.खासदार सुळे मोर्चात सहभागी झाल्या होत्या.गावांमधून कर वसूल करता, तर तिथे विकासकामेही करायला हवीत. सरकारने गावांचा समावेश करून दिला व विकासकामांसाठी एक छदामही दिला नाही असा आरोप देखील त्यांनी केला.

घाबरू नका हवा बदलत आहे – अजित पवार

You might also like
Comments
Loading...