पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे

supriya sule

पुणे – काल फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असून तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या त्या स्वतःच्या घरी घाला. तसेच पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महाविद्यालयात गीता वाटपाच्या आदेशामुळे नवा वाद

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांंशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

दरम्यान,फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेवर काही विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला होता. अशा प्रकारे पूजा घालत कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. मात्र, दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयात पूजा केली जात आहे, त्यामुळे ही कॉलेजची परंपरा असल्याचा दावा, फर्ग्युसनचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी केला आहे.

फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार