Share

Supriya Sule | अखेर सुप्रिया सुळेंनी ‘तो’ शब्द पाळला, गावकऱ्यांचा पेढे वाटून जल्लोष

Supriya Sule | बारामती : भाजप नेत्या तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती (Baramati) तालुक्यातील गावांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी दोन गटांमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासमोरच गोंधळ उडाला होता. या वेळी सुप्रिया सुळे यांनी दिलेला शब्द सुळेंनी पार पाडल्यामुळे सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला आहे.

गावातील अंतर्गत वादामुळे गेली दीड वर्षापासून या रोडचे काम रखडले होते. यामुळे या रोडलगत असणारे व्यावसायिक, वाहनधारक, शाळकरी मुलांना रोडवरील उडणाऱ्या धुळीचा सामना करावा लागत होता. सततच्या धुळीमुळे अनेक जणांना दम्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.

यादरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी समन्वय साधून या रोडचे डांबरीकरण केल्याने, डोर्लेवाडी ग्रामस्थांनी पेढे आणि फटाके वाजवत जल्लोष साजरा केला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन यावेळी दिलं होतं. तसेच त्यांच्या या आश्वासनावर गावकऱ्यांनी संमती देखील दर्शवली होती. सुप्रिया सुळे यांनी यावेळी सर्व ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | बारामती : भाजप नेत्या तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now