इम्तियाज जलीलांनी मराठीतून तर सुप्रिया सुळेंनी घेतली हिंदीतून शपथ

imtiyaz-jaleel

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी खासदारकीची मराठीतून शपथ घेतली मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून शपथ घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरु झालं असून, पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी आणि संस्कृतमध्येही शपथग्रहण केलं. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतली, तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून शपथ घेतली.

इतकेच नव्हे तर, भाजपच्या पूनम महाजन, हीना गावित यांनीही हिंदीतून शपथ घेतली. परंतु इम्तियाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.Loading…
Loading...