fbpx

सुप्रिया सुळेंच्या सभेकडे गावकऱ्यांनी फिरवली पाठ; सरपंचासह मोजक्या कर्यकर्त्यांची उपस्थिती

बारामती : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अद्याप कुठल्याही पक्षात जरी निवडणुकांची चर्चा नसली, तरी देखील भाजप,कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना अशा सर्वच पक्षातील नेते निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी – गाठी व सभांचे देखील आयोजन करण्यात येत असल्याचं पाहायला मीळतं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदार संघात निवडणुकीची तयारी सुरु केलीये. काल त्यांनी आपल्या मतदार संघातील शिसृफळमध्ये सभा आयोजित केली होती. मात्र ही सभा चांगलीच चर्चेत आली. कारण या सभेकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली. या सभेला केवळ सरपंच आप्पासाहेब आटोळे.आणि त्यांचे सहकारी वगळता बाकी कोणीही उपस्थित नव्हते. या सभेची पूर्व सूचना चार दिवसांपुर्वीचं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तरी देखील सभेला गर्दी न झाल्याने राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान

शरद पवारांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली