मुंबई: राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राजर्षींचा पुरोगामीत्वाचा वारसा जोपासत विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती ठराव केला. याचेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.
“पतीच्या निधनानंतर महिलेच्या हातातील बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे आदी प्रथा पाळल्या जात होत्या. या प्रथांना हेरवाड ग्रामपंचायतीने दूर करत एक नवा विचार मांडला होता. अशा प्रकारच्या प्रथा दूर करण्यासाठी हेरवाडच्या धर्तीवर राज्यभरात जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याबाबत प्रोत्साहित करावे असा शासन आदेश काढला आहे.”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिली आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राजर्षींचा पुरोगामीत्वाचा वारसा जोपासत विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती ठराव केला.पतीच्या निधनानंतर महिलेच्या हातातील बांगड्या फोडणे,कुंकू पुसणे आदी प्रथा पाळल्या जात होत्या.
— Supriya Sule (@supriya_sule) May 19, 2022
राज्अय शासनाचे हे अतिशय महत्वाचे असे पुरोगामी पाऊल असून याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडी सरकारचे सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बापरे…! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट; पुढे काय झाले? पाहा VIDEO!
- महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा
- मास्टरप्लॅन..! IPL 2023 मध्ये होणार ‘मोठा’ बदल; BCCI लागलं कामाला!
- IPL 2022 LSG vs KKR : थ्रिलर विजयानंतर आक्रमक सेलिब्रेशन..! गंभीरचा डगआऊटमधील VIDEO होतोय व्हायरल
- देवेंद्र फडणवीसांनी आत्मचिंतन करण्याची गरज – सक्षणा सलगर