अजित दादांपेक्षा सुप्रिया ताईच फास्ट

टीम महाराष्ट्र देशा –  सुप्रिया सुळे सध्या सोशल माध्यमावर जास्त सक्रीय झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्यासोबत सेल्फी काढून रोज पोस्ट करतात. याबरोबरच ट्विटरवर देखील नेहमी सक्रीय असतात. अनेक मुद्द्यावर त्या  आपले मत व्यक्त करीत असतात. त्यांच्या या सक्रीय सोशल वापरामुळे सोशल मीडियात अजित दादांपेक्षा सुप्रिया ताईच फास्ट ठरल्या आहेत.

  फेसबुक ट्विटरवर अजित पवारांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त सक्रिय आहेत,    असं ही चिंतन बैठकी  सांगण्यात आलं. त्यांच्या ट्विट्समुळेच त्यांना फॉलोअर्स जास्त असल्याचं बोललं जातं. ट्विटरवर सुप्रिया यांचे फॉलोअर्स ३,२७,००० तर अजित पवार- ४१,८०० फॉलोअर्स आहेत. फेकबुकवर देखील अजित पवार यांचे फॉलोअर्स ४,३७,००० आहेत. तर सुप्रिया सुळे जवळपास ६,३०,००० लाख फॉलोअर्स आहेत.

पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी व कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या चिंतन बैठकीचा कार्यक्रम कर्जत येथे चालू आहे. या चिंतन बैठकीला पक्षांचे सर्वच वरिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी सोशल मीडियावर जास्ती लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.