fbpx

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

चेन्नई : शरद पवार यांच्या कन्या खासद्र सुप्रिया सुळे यांना आज चेन्नई येथील राजभवनात तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार प्रदान प्रदान करण्यात आला.

प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई मॅगेझिन यांच्या वतीने संसदरत्न पुरस्कार हा प्रत्येकवर्षी संसदेतील खासदाराची कामगिरी तपासून हा पुरस्कार दिला जातो. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव असल्याचे म्हटले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे”.

2 Comments

Click here to post a comment