Share

Supriya Sule | लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; नेमकं घडलं काय?

Supriya Sule | नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी संबंधित प्रकरणाविषयी लोकसभेत माहिती दिली.

संबंधित प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष द्यावं, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या या मागणीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजब विधान केलं. “तुमच्या कुणाचंही वक्तव्याची नोंद होत नाहीय. कोणत्याच रेकॉर्डमध्ये तुमचं विधान जाणार नाही. हा संवेदनशील विषय आहे. विषय दोन राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र काय करणार? दोन राज्यांमध्ये केंद्र काय करणार, हे संसद आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्राचे नागरीक जात होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र सुरुय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक …

पुढे वाचा

India Marathi News Politics