‘शरद पवार हे नाणं अभीभी मार्केट में चलता है’

टीम महाराष्ट्र देशा : पक्षाची कितीही पडझड होत असली तरी शरद पवार हे खणखणीत नाणं आहे. त्यामुळे शरद पवारांना राज्याच्या राजकारणात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष अजूनही खंबीर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. संवाद यात्रेदरम्यान हिंगोलीतल्या वसमतमध्ये बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  शरद पवारांच्या नावाच्या जप करण्याने अनेक जणांनी प्रसिद्धीचा फायदाही घेतलेला आहे. या नावावर टीका करा अथवा स्तुती करा प्रसिद्धी हमखास मिळते. अनेकांनी या नावावरच राज्य़ात राज्य केलं आहे. त्यामुळे अपना नाना अभीभी मार्केट में चलता है, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसेच, येत्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचचे कितीही नेते पक्ष सोडून गेले तरी राष्ट्रवादी आजही तितक्याच ताकदीने उभी आहे, असे सुळे यांनी सांगीतले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकी आधीच काही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कितीही नेते पक्ष सोडून गेले तरी शरद पवार यांच्या नावामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा विजयी होणार आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांमध्ये रुजवत आहेत.