Share

Sharad Pawar | शरद पवारांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या…

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांची तब्येत खालवली होती. अशातच आता राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना 2 नोहेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

शरद पवारांवर गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना खरंतर आज संध्याकाळीच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर सध्या रुग्णालयातच उपचार सुरु आहे. तसेच त्यांना उद्या सकाळी अकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती काल खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल अडीच तास शरद पवार यांच्यासोबत गप्पा मारल्या.

कुटुंबाव्यतिरिक्त शरद पवार यांना कोणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे बाकी कोणीही त्यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं होते.

महतवाच्या बातम्या :

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now