Share

Supriya Sule । संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,

Supriya Sule । पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर झाला आहे. चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा जामीन महत्वाचा मानला जात आहे. यावर , राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. “संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते लवकरच बाहेर येतील अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

त्या म्हणाल्या, संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख हे आमचे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेला असतो. मात्र, ज्या पद्धतीने तिघांना अटक झाली, हे दुर्देवी होतं. एखाद्यावर जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार कोणत्या परिस्थितीतून जातात, हे मी छगन भुजबळ यांच्यावेळी जवळून बघितलं आहे. त्यामुळे आज संजय राऊतांना न्यायालयाने जो न्याय दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते”, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

त्याचबरोबर, “संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख असे आमचे काही सहकरी आहेत, ज्यांनी काही कारणास्तव अटक करण्यात आली होती. त्यांना आता न्याय मिळतो आहे. यापूर्वी अनिल देशमुखाना जामीन मिळाला, आता संजय राऊतांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनी लवकर बाहेर येऊन जनतेची सेवा करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच आमची अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule । पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now