ते ‘अदृश्य हात’ आमचे नव्हेत-सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

बारामती : ‘देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचविणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही.’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

Loading...

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे काल अशाच पद्धतीचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील केलं होत .गेल्या तीन वर्षात अनेक प्रश्नावर सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसंच खड्ड्यांच्या प्रश्नावरुनही सरकारवर निशाणा साधला.दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या वांरवार भेटी होतात. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला की, ‘शरद पवार यांचे सर्व पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत. पवारसाहेब कृषीमंत्री असताना मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देखील त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या.’ असं त्या यावेळी म्हणाल्या.

 Loading…


Loading…

Loading...