कर्जमाफी फसवी;सुप्रिया सुळेंचा घणाघात

सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेची धमकी म्हणजे केवळ विनोद

नाशिक : राज्य शासनाऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी असून सरकारने कर्जमाफी मनापासून दिली नाही. यात शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असून अनेक शेतकरी यापासून वंचितदेखील राहिले असल्याचे सांगून प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांची दिवाळी खरी दिवाळी अशी सडकावून टीका आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशकात केली.

आज दुपारी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इंजिनियरिंग महाविद्यालयात खा. सुळे संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी खा. सुळे म्हणाल्या, शासनाचे दररोज नविन जीआर येत आहेत. कर्जमाफीही मनापासून केलेली नाही. कांदा प्रश्नावर सरकार आता दबाव आणत आहे. भाव पडण्यासाठी सरकार प्रयत्न करतांना दिसते. व्यापारी आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या दमबाजी विरोधात आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या की, आम्ही सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवले आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाला चांगले यश मिळाले आहे.

नांदेडच्या पराभवाचे भाजप व सेनेने आत्मचिंतन करावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी राष्ट्रवादी राज्यात सरकार विरोधात जास्त आंदोलन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना पक्षावर टीका करतांना त्या म्हणाल्या की, शिवसेना इज व्हेरी फनी पार्टी असून सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेची धमकी केवळ विनोद आहे. सकाळी विरोध करायचा आणि रात्री एकत्र बसायचे असे आहे. शिवसेनेची भूमिका कोणालाच अद्याप समजली नाही. शिवसेना आणि भाजपच्या या डबल रोल मुळे कंटाळा आला असल्याचे खा. सुळे म्हणाल्या.

You might also like
Comments
Loading...