‘हर्षवर्धन पाटील म्हणजे भांडण झाल दिरासोबत आणि सोडून दिला नवराचं’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँगेसला मोठा धक्का बसला आहे. कारण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदापूरचे माजी आ. हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. इंदापूर विधानसभेच्या तिकिटावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावर राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या आरोपात फारसं तथ्य नाही. भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं असं हर्षवर्धन पाटील यांचं झालंय, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटलांना लगावला आहे. तसंच हर्षवर्धन पाटलांनी चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेतला, असेही सुळे म्हणाल्या.

दरम्यान भाजप प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्यांवर भाजपमध्ये आलो आहोत. तसेच पक्षांतर करताना कोणतीही अट घातली नाही. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यास मी कायम सक्षम असेल. तसेच आता मी पक्ष बदलला आहे. मात्र माझे शेजारी काही बदलता येत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता माझ्या मतदारसंघात लक्ष घालाव, असा अप्रत्यक्ष टोला हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.