Share

Supriya Sule | “राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय…”; सुप्रिया सुळेंचा गजानन किर्तीकरांवर निशाणा

Supriya Sule | पुणे :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं होतं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गजानन किर्तीकरांना खोचक टोला लगावला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय बातमी कशी होणार? हे नाणं चालतंय मार्केटमध्ये. ठीक आहे. किर्तीकर हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांना अधिकार आहे तो बोलायचा. पण शेवटी राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही ना”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, एअरबस टाटा हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेल्यानंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, मला अतिशय प्रांजळपणे मुख्यमंत्र्यांना विचारते की गेली ७ वर्ष तुम्ही सत्तेत आहात. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, तेव्हा तुम्ही सत्तेत होतात. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही मंत्री होतात. त्यामुळे ७ वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये तुम्ही सहभागी आहात असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | पुणे :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now