‘सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणी, गाठीभेटी, राजकीय दौरे यासारख्या राजकीय घडामोडींना वेग आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा चांगलेच सक्रीय होताना दिसत आहे.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नऊ सप्टेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर आहे. मंगळवारी संवाद यात्रेनिमित्त जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला.

वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेले अनेक वर्षे एका विचाराने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या नेत्यांची मुले आपल्या सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावत आहेत. असे वंशाचे दिवे काय कामाचे? अशी घणाघाती टिका सुळे यांनी गेलेल्या राज्यातील काही नेत्यांच्या मुलांवर केली.

दरम्यान, पुढे बोलताना म्हणाल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली असून, भाजपत सर्वात जास्त भ्रष्ट मंत्री आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास देखील सुळे यांनी व्यक्त केला.