नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाने कारवाया केल्या. यावरुन केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करुन कारवाया करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. यावरुन आता संसदेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदींनी ट्विट करुनही औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींच्या याच मुद्द्याचा संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला आहे.
.@supriya_sule Tai delivered a speech on demand for grants.
She expressed her disappointment on an MP selectively quoting on Chhatrapati Shivaji Maharaj. One of Shivaji Maharaj's qualities was he never attacked the families of his opponents & always protected the women. pic.twitter.com/lkdJ8C6dnz— NCP (@NCPspeaks) December 14, 2021
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी अन्यायाविरुद्ध लढले. त्यांनी आपल्या लढाईमध्ये कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी, सीबीईच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य करतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवयरायांनी नेहमीच महिला आणि मुलांचे रक्षण केले. मात्र ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सुप्रिया सुळे संसदेत बोलताना म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस; कारवाईची शक्यता
- ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी याचिका फेटाळली!
- आमदाराचा मी नामदार झालो; मात्र आजही मी तसाच- आ. संदीपान भुमरे
- मनात टिकटिक वाजत असताना रुपाली पाटील सोडणार का बाण?
- ‘राऊत साहेब, शेतकऱ्यांसोबत पंक्तीला बसण्यासाठी 56 इंचाची छाती लागते’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक