Supriya Sule | मुंबई : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टाट एअरबस प्रकल्पावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)
एखादा एमओयू महाविकास आघाडी सरकारने केला असेल तरी त्याचं क्रेडीट ईडी सरकारचं आणि एखादा प्रकल्प बाहेर गेला, तर त्याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडायचं, असा प्रकार सध्या सुरू आहे. माझी त्यांना एवढीच विनंती आहे, किमान जनाची नाही तर मनाची ठेवा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलंच फटकारलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. आज हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामांवर टीका करतात. मात्र, ते विसरतात की भाजप-शिवसेनेची पाच वर्ष, महाविकास आघाडीची दोन-अडीच वर्ष आणि आता, अशी गेली सात वर्ष ते सत्तेत आहे.
प्रकल्प कोणत्या राज्यात जातो, त्याला माझा आक्षेप नाही. मात्र, जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते, तीन महिन्यात असं काय झालं की हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत, याचं उत्तर मिळायला हवं, याची जबाबदारी ‘ईडी’ सरकारने घ्यायला हवी. तप्रधानांबरोबर त्याचं काय बोलणं होतं हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे, की ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत. राज्यात नोकऱ्याही निर्माण होणं बंद झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होतं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर…”; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा
- Gulabrao Patil | “50 आमदार एकदम ओक्के, घरी…”; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्ला
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना राणेंवरची टीका भोवली, कुडाळ पोलिसांनी नोटीस बजावली
- Rana-Kadu | राणा-कडू वाद होणार गोड? दोघेही शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईला
- Rupali Thombare | “जागे व्हा महाराष्ट्रातील लोकांनो! नाही तर…”, रुपाली ठोंबरेंच जनतेला आवाहन