मुख्यमंत्र्यांनी दादांची ट्युशन लावावी म्हणजे अभ्यास लवकर होईल – सुप्रिया सुळे

श्रीगोंदा : सरकारकडे कोणताही प्रश्न घेऊन जा. त्यांचे एकच उत्तर असते, अभ्यास सुरू आहे. तीन वर्ष झाली पण मुख्यमंत्र्यांचा अभ्यास चालूच आहे. बहुतेक त्यांना दादाची ट्युशन लावावी लागेल म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अभ्यास लवकर होईल. अशी खरमरीत टीका टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून सुरवात झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यात आलं की आठवते कोपर्डीची घटना. चार्जशीट दाखल होऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी राष्ट्रवादी सुरुवातीपासून आग्रही राहिलं. केंद्र सरकारच्या निर्भया फंडचे फक्त ६०० कोटी खर्च झाले, बाकी १४०० कोटी कुठे गेले ? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळेंनी केला आहे.

पंतप्रधान सगळीकडे उज्ज्वला योजनेची जाहिरात करतात. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या योजनेतील घोटाळा बाहेर आणला. आता पेट्रोलियम मंत्री कबूल करतात की ही योजना पूर्णपणे राबवण्यात आम्हाला अपयश आले, हे वाघ व पक्षाचे यश आहे. अस सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठी शाळांमध्ये बहुजन समाज, शेतकरी, शेतमजुरांची मुलं जातात. सरकारने १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढच्या पिढीचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकतो. सरकारने एकही मराठी शाळा बंद पाडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. पण शाळा बंद पडू देणार नाही. असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.

You might also like
Comments
Loading...