शहरी माओवाद्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी केले पोलीस आणि सरकारवर शरसंधान

Supriya Sule

टीम महाराष्ट्र देशा- शहरी माओवादी म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या विचारवंतांच्या बाजूने खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या पहायला मिळाल्या . ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडलं जात असल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांना आणि सरकारला घेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सरकारवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली.

Loading...

प्रमुख मुद्दे –

  • गांधीजींनी जो शांततेचा मार्ग सांगितला तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व या दोन्हीची सांगड घालत याची जाणीव आजच्या पिढीला करून देण्यासाठी आज आम्ही येथे शांततेत आंदोलन केले.
  • निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या पण पारदर्शक कारभार दिसत नाही.
  • सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलेही भाष्य केले नाही. आज सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थथा आहे.
  • विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते,जेलमध्ये टाकले जाते.दंगली घडवणाऱ्यावरील गुन्हे मागे घेऊन मोकाट सोडले जात आहे.
  • कालवा फुटी चे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अंत्यत चुकीची आहे.
  • आपण 21 व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीचे दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्याना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे.अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे.अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी