मुख्यमंत्र्यांनी पक्षावर नव्हे तर महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे – सुप्रिया सुळे

devendra-supriya

पुणे- राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर महिलांवरील प्रश्नाकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांना पक्षाच्या प्रचारातून वेळ मिळत नाही. माझे मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पक्षाला कमी वेळ द्या आणि महिलांच्या सुरुक्षेकडे लक्ष द्यावे. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर महिलांवरील प्रश्नाकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांना पक्षाच्या प्रचारातून वेळ मिळत नाही. माझे मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पक्षाला कमी वेळ द्या आणि महिलांच्या सुरुक्षेकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, काल फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं mt व्यक्त केलं आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असून तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या त्या स्वतःच्या घरी घाला. तसेच पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.