गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA)सोमवारी दिल्लीत प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. येथे झालेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला. उत्तर- पूर्व दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे भीषण रूप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिल्लीमध्ये झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडून सर्व भागातील अधिकाऱ्यांना कोणत्याही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना न होऊ देता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...

दिल्लीतील संपूर्ण पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय धार्मिक स्थळांवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आता याच मुद्यावरून राजकीय आरोप -प्रत्यारोप होऊ लागले आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आले असताना राजधानी दिल्लीत दंगल होतेच कशी? असा सवाल उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक व विरोधकांमध्ये सोमवारी हिंसाचार झाला होता. त्यावर सुप्रिया सुळे या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी ? असे खडेबोल सुळे यांनी सुनावले.

दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढते अत्याचार यासह महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. हिंगणघाट,सिल्लोड,औरंगाबाद यासह राज्यातील अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार करून जाळण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत त्यावर सुप्रिया सुळे आपल्या पक्षातील गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं