तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते? – सुप्रिया सुळे

घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. “महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचे भाष्य करणाऱ्या राम कदम यांच्या वर आपण काही कारवाई करणार आहात का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला.

“या राज्यात रोडरोमियोंच्या त्रासामुळे मुली रस्त्यावर उतरायला देखील घाबरत असताना तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते?” अशा कणखर शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली आहे.

 

You might also like
Comments
Loading...