Share

Supriya Sule | “भाजप पक्ष आता भारतीय जनता लाँड्रींग…”, सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला भारतीय जनता लाँड्रींग म्हणून संबोधलं आहे. भाजपवर टीका करत असताना राष्ट्रावादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना देखील त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांचा भाजप पक्षाला टोला 

भाजप नेत्यांकडे बोलण्यासाठी आता काही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू असून पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. भाजप आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री झाला आहे, असा टोला सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी लगावला आहे. तसेच ज्यांनी भाजपाला वाढवलं, संघटना मजूबत केली, अगदी माईक लावण्यापासूनची कामं ज्या कार्यकर्त्यांनी केली, ते कार्यकर्ते कुठे आहेत?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपला ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आज कुठे आहेत? मात्र त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरं वाटलं. आमच्याकडे देखील त्यांना काही कमी नव्हतं. मात्र बर झालं त्यांना दोन्हीकडं देखील सन्मान मिळत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांची टीका 

राज्यात सध्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार आहे. शिंदे गटात आमदार अस्वस्थ आहेत, काही काळ थांबा, सर्वच समोर येईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणालेत. तसेच 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार, योग्य वेळेची वाट पाहतोय, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, शिवसैनिकांना आवडलेलं नाही, असंही अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.

महत्वाच्या बतम्या :

Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now