‘राष्ट्रवादीमध्ये त्रास झाला, हे तुम्ही कधी सांगितले नाही’

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला. शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे, त्यामुळे प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले आहे.

भाजप प्रवेशानंतर उदयनराजे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. त्यांनी आत्मपरीक्षण केलं असतं तर आत्मक्लेशची वेळ आली नसती, असा टोला शरद पवारांना नाव न घेता लगावला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत असताना सुद्धा स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव आहे असंही विधान केल आहे.

यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला त्रास त्यांनी कधी सांगितला नाही असं विधान केले आहे. तसेच उदयनराजे यांनी संसदेत चांगले काम करावे असंही त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी १५ वर्षात त्यांना कोणताही त्रास झाल्याचं कधीच ऐकलं नाही. ते तसं कधीच बोलले नाही. मात्र त्यांना त्रास झालाय आता ते बोलले आहेत. त्यांना शुभेच्छा. कोणत्याही पक्षात गेले तरी ते चांगलंच काम करतील, असं त्या म्हणाल्या.