‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ बोलणाऱ्यांना आपलाच भ्रष्टाचार थांबेना- सुप्रिया सुळे

जळगाव: लोकसभा निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाउंगा ना खाणे दुंगाचा नारा दिला होता. मात्र मध्यंतरी भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याच गोष्टीचा धागा पकडत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असं म्हणणाऱ्या भाजपा सरकारमधील भ्रष्टाचार कुठे थांबलाय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सध्या सुप्रिया सुळे या युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात युवकांशी संवाद साधत आहेत. आज त्या जवळगाव येथे आल्या असता त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ याचा अर्थ आता आता उपासमारीला लागू पडत असल्याच देखील त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान काही विद्यार्थ्यांनी राजकारणत असलेल्या घराणेशाहीवर प्रश्न विचरला असता, माझी मुलं राजकारण येणार नसल्याच उत्तर त्यांनी दिल आहे.